धुळे-नंदूरबार विधानपरिषदेची पोटनिवडणूक पुढे ढकलली

0
9
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सध्या कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने आज याबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या पोटनिवडणुकीला मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी  भारत निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने  ही पोटनिवडणूक ही अधिसूचना निर्गमित झाल्यापासून ६०  दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा