धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सर्व मिळून मार्गी लावू, केंद्राकडे पाठपुरावा करूः मुख्यमंत्री ठाकरे

0
39
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही राज्यातील सगळ्यांची भावना आहे. त्यांना आरक्षाण मिळवून देण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रितपणे केंद्राकडे पाठपुरावा करू आणि हा प्रश्न मार्गी लावू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय हा गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहे. या विषयावर परस्पर मतभेद दूर ठेऊन सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारितील आहे. तेव्हा आपण एकत्रितपणे केंद्राकडे जाऊन या समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. या देशातील जे समाज आजही वंचित आहेत त्यांच्या कल्याणासाठी सरकार काम करेल. या समाजाच्या कल्याणासाठी आवश्यक ते सर्व केल्या शिवाय मी राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली. आमदार रामहरी रुपनवर, प्रवीण दरेकर, महादेव जानकर, जयंत पाटील, शरद रणपिसे, विनायक मेटे आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा