अकोला: संपत्तीच्या वादातून वडिलांनीच मुलावर बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली. ही घटना जठारपेठ चौकातील केला प्लॉटमधील इंद्रायणी मतिमंद शाळेजवळील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये घडली. मृतक मनीष भारती असून मारेकरी त्याचे वडील बाबा भारती आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचा मुलगा राजेश भारती ही काँग्रेसचा मोठा नेता आहे बाबा भारती व त्यांचा मुलगा मनीष भारती यांच्यामध्ये संपत्तीचा बऱ्याच वेळा वाद होत होता. या वादाने परिसीमा गाठली होती. मनिष भारती हा वडील बाबा भारती याच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्याने वडिलांसोबत संपत्तीवरून वाद घातला. मुलाच्या हातात असलेले धारदार शस्त्र पाहून बाबा भारती यांनी बचावासाठी जवळ असलेली बंदुक काढली. मुलगा अंगावर येत असल्याची दिसतात त्यांनी त्या बंदूकीतून त्याच्या छातीमध्ये एक गोळी झाडली. मुलगा मनीष हा जागीच ठार झाला. ही माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी सिव्हील लाइन, रामदास पेठ यासोबतच शहर उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलिस दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी बाबा भारती यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेबाबत बाबा भारती यांनी तोंडी माहिती दिली. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत. तर दोन दिवस आधी मनीष भारती याला तीन महिन्यासाठी तडीपार करण्यात आली होते. मनीष भारती हा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
सर्वात लोकप्रिय
व्हिडीओः स्कूलबसमध्ये घुसून गतीमंद मुलीची छेड काढून विनयभंग, गुंडाचे टोळके मोकाट!
औरंगाबादः वळदगाव परिसरातील स्वयंसिद्धा
संस्थेच्या गतीमंद मुलांच्या शाळेच्या स्कूलबसमध्ये घुसून काही टवाळखोरांनी एका अल्पवयीन
मुलीची छेड काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे....
व्हायरल व्हिडीओ: बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ
औरंगाबादः पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी मिरवणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या बीड जिल्ह्यातील दोन लोकप्रतिनिधींचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे...
‘दिल्लीत प्रचाराला बोलावून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना वाटायला लावल्या चिठ्ठ्या!’
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या
भाजप नेत्यांचे एकेक रंगतदार किस्से समोर येऊ लागले आहेत. महाराष्ट्र भाजपचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही प्रचारासाठी...
औरंगाबादेत कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरूवात, आता कोणालाही लागण होण्याचा धोका!
औरंगाबादः औरंगाबादेत कोरोना विषाणूच्या समूह संसर्गाला सुरूवात झाली असून या पुढे सार्वजनिक आरोग्य उपाययोजना म्हणून लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांचा फारसा उपयोग होणार नाही, असा...