घरात राहूनच महात्मा फुले जयंती साजरी कराः भुजबळांचे आवाहन

0
37
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देशात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला असून प्रत्येकाने आपल्या घरात राहणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण यावर नियंत्रण मिळू शकतो. त्यामुळे बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला त्या क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती आपल्या घरातील पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ज्योत लावून आपल्या घरातच साजरी करावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

११ एप्रिल रोजी देशभरात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आपण साजरी करत असतो. मात्र साऱ्या देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे. त्यामुळे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करत असताना आपण कुणीही कुठेही बाहेर पुतळ्याजवळ गर्दी करू नये, शासनाने सांगितल्याप्रमाणे  सोशल डिस्टन्स पाळावे असे त्यांनी सांगितले आहे.

पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली होती. आपल्याला मात्र कोणीही रुग्णांची सेवा करण्यास बाहेर पडा असे सांगत नाही तर आपण घरात राहा, म्हणजे आपोआपच या आजाराला आपण दूर करू शकतो. त्यामुळे या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण आपण घरातच राहून करून त्यांना अभिवादन करावे. त्यातूनच खऱ्या अर्थाने त्यांचे विचार जोपासले जातील. त्यामुळे कुठेही मोठे कार्यक्रम, सोहळे आयोजित न करता आपल्या घरातच त्यांच्या विचारांचे स्मरण करावे, असे भुजबळ म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा