२८ मार्च रोजी होणारी एमसीएची सीईटी परीक्षा ३० एप्रिल रोजी होणार

0
34
संग्रहित छायाचित्र.

मुंबई:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने २८ मार्च रोजी घेण्यात येणारी पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता ३० एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. मंत्रालयात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी सामंत बोलत होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सीईटी परिक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला  आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे सामंत म्हणाले.

एप्रिलमध्ये होणाऱ्या सीईटी परिक्षांबाबत ३१ मार्चनंतर राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी  काळजी करु नये याबाबत शासनाला सहकार्य करावे आणि सर्वांनी कोरोनासंदर्भात स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन सामंत यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा