मास्क, सॅनिटायझरची विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर धडक, २५ ठिकाणी धाडी

0
15
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपयोगात येणारे मास्क आणि सॅनिटायझर्सची विनापरवाना तसेच बनावट उत्पादने तयार करणाऱ्यांवर तसेच विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई सुरु केली असून आता पर्यंत राज्यातील विविध भागात २५ धाडी टाकून सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

मास्क व सॅनिटायझर्सच्या तपासणी व शोध कार्यात अमरावती, औरंगाबाद, बृहन्‍मंबुई, कोकण विभाग, नाशिक नागपूर,  पुणे विभाग तसेच गुप्तवार्ता मुख्य व इतर विभाग यांच्या मार्फत आता पर्यंत २ हजार ६०४ ठिकाणी  तपासणी करण्यात आली. आतापर्यंत राज्य भरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने २५ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या आहेत. आणि अंदाजे– १ कोटी ४७ लाख ५४ हजार ५५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोना आजार दूर करणारेआयुर्वेदिक औषधे व कोरोना प्रतिबंधक गाद्या या प्रकारच्या  खोट्या जाहिराती करणारे, विक्री करणारे व या प्रक्रीयेत सहभागी होणारे यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा