संकटकाळी राज्य महत्वाचे की पक्षश्रेष्ठींची भक्ती?: रूपाली चाकणकरांचा भाजप नेत्यांना सवाल

0
877
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रावर आलेले कोरोना विषाणू संसर्गाचे अभूतपूर्व संकट निस्तरण्यासाठी सर्व समाजघटकातून मदतीचे हात पुढे येत असतानाच महाराष्ट्रातील भाजपच्या आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला न देता ‘पीएम केअर’ला देऊ केल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधत किमान संकटकाळी तरी माणुसकी, राज्य महत्वाचे की पक्षश्रेष्ठींची भक्ती?,  असा सवाल त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना केला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यात उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत राज्याला आर्थिक मदत करण्याऐवजी केंद्रातील भाजपच्या सर्वोच्च नेत्याची खुशमस्करी करण्यातच भाजप आमदार आणि भक्तगण मग्न आहेत. कोरोनाच्या संकटाशी लढताना प्रत्येकाकडून माणुसकीची अपेक्षा असताना महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांनी मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे आपल्या आमदार व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याऐवजी ‘पीएम केअर’ला सोपवून ओंगळवाणे आणि कुटील राजकारण खेळले आहे. भाजप आमदारांची ही कृती त्यांच्यासाठी संकटकाळीही ‘माणुसकी’पेक्षा पक्षच मोठा असल्याचे दाखवून देणारी असल्याचे टिकास्त्र चाकणकर यांनी सोडले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्षाच्या आमदारांनी मार्च महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन संकट काळात पक्ष मोठा नसून माणुसकी आणि आपले राज्य महत्त्वाचे असल्याचे दाखवून दिले. त्यावरून तरी भाजप आमदार बोध घेतील का?, असा सवालही चाकणकर यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा