कोरोनाचा संसर्गः औरंगाबाद, धुळे आणि सोलापुरात सुरू होणार तपासणी प्रयोगशाळा

0
96
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः कोरोना पार्श्वभूमीवर हाफकिनला आणखी दोन लॅब पुढील 4 दिवसांत सुरु होतील. धुळे, औरंगाबाद आणि सोलापूरमध्येही लॅब सुरु करण्यात येणार आहे. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार आहेत. या लॅबसाठी केंद्र शासनाकडून १० लाख तपासणी किट्स मिळणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात ७०० व्हेंटिलेटर, ६०० आयसोलेशन बेडस तयार आहेत. खासगी रुग्णालयांना आयसोलेशन बेड ठेवण बंधनकारक करण्यात आले आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात १०० आणि वायसीएम रुग्णालयात ६० आयसोलेटेड बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही टोपे म्हणाले. कोरोना पार्श्वभूमीवर ज्या व्यक्तींना त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.त्या व्यक्तींच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ असा शिक्का मारण्यात आला आहे. या व्यक्तींना १४ दिवस कोणाच्याही संपर्कात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनीही स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा