कोरोनासाठी रक्त चाचणी होत नाही, रूग्णालयांची व्हायरल यादी चुकीचीः आरोग्य मंत्री राजेश टोपे

0
802
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना विषाणुच्या संशयित रूग्णांच्या रक्ताची चाचणी घेतली जात नाही. त्यासाठी रूग्णाच्या घशाच्या द्राव ( नसो फॅरिंजियल स्वॅब) घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यामुळे कोरोना संशयिताच्या रक्तचाचणीसाठी महाराष्ट्रातील रुग्णालयांची व्हायरल होत असलेली यादी दिशाभूल करणारी आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

कोरोना संशयिताची रक्तचाचणी घेतली जाते आणि अशी रक्त चाचणी घेण्याची सुविधा अमूक रूग्णालयात उपलब्ध असल्याचे सांगून सोशल मीडियावर रूग्णालयांची यादी व्हायरल केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री टोपे यांनी हा खुलासा केला आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.

राज्यात संशयित रूग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रूग्णाच्या घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. राज्यात मुंबई, पुणे व नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठवले जातात, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले असून राज्यात काही दिवसांत चार ते पाच ठिकाणी प्रयोगशाळा वाढवण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा