राज्यातील सरकारी कार्यालयात आता दिवसाआड रोज २५ टक्केच उपस्थितीः मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
97

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात आता दिवसाआड रोज २५ टक्केच कर्मचारी उपस्थित राहतील, अशी महत्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  आज केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी थेट प्रक्षेपणाद्वारे संवाद साधला. त्यात त्यांनी ही घोषणा केली. गर्दी टाळणे हा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा उपाय असल्यामुळे घराबाहेर पडू नका आणि गर्दी करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. सरकारी कार्यालयांतील गर्दी टाळण्यासाठी आधी सरकारने दिवसाआड रोज ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीचा निर्णय घेतला होता. आता आज २५ टक्केच कर्मचारी उपस्थितीचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सरकारी कार्यालयातील कामकाज दररोज अवघ्या २५ टक्केच कर्मचाऱ्यांवर चालवावा लागणार आहे.

 कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड हा महानगरांतील जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा