कोरोना चाचणी क्षमतेत महाराष्ट्र देशात अव्वलः दररोज ५५०० चाचण्यांची क्षमता!

0
20

मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५ हजार ५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आतापर्यंत ६ हजार ३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५ हजार ९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारने तातडीने शासकीय महाविद्यालये आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी दिली. सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांव्दारे कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज २ हजार ३०० चाचण्या करण्याची जाण्याची क्षमता आहे. आणखी ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईल, असे टोपे म्हणाले.

राज्यात सध्या ८ खासगी प्रयोगशाळांमधून चाचण्या केल्या जात असून त्यांची क्षमता दररोज सुमारे २ हजार ८०० चाचण्या घेण्याची आहे. मात्र सध्या तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याची आवश्यकता नसून  कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलनुसार चाचण्या केल्या जात असल्याचे टोपे यांनी संगितले.

कोरोनाच्या संकाटाला सामोरे जाण्यासाठी राज्याच्या आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध आहे. राज्यात सध्या दीडलाख एन-९५ मास्क उपलब्ध असून सुमारे ३५ हजार पीपीई किटस् तर २१ लाख ७० हजार ट्रीपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. अजूनही ही साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा