औरंगाबादेत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, बाधितांची संख्या २० वर

0
219

औरंगाबादः औरंगाबादेत शुक्रवारी रात्री उशिरा आणखी दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २० वर गेली आहे.

हडको एन-११ भागातील यादवनगरमध्ये राहणारा एक २९ वर्षीय तरूण आणि सातारा-देवळाई परिसरात राहणाऱ्या  एका ४० वर्षीय महिलेच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता २० वर पोहोचली आहे. दरम्यान, शुक्रवारी चिकलठाणा येथील विशेष कोरोना रूग्णालयात ७५ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १३ जणांमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यामुळे त्यांना घरातच अलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. या रुग्णालयात ५७ नवीन रुग्णांना भरती करण्यात आले असून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घाटीतील कोरोना चाचणी केंद्रात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

सारीमुळे ११ जणांचा मृत्यूः औरंगाबादेत एकीकडे  कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे सारीच्या ( सिव्हियरली ऍक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) आजाराचे रूग्णही वाढत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत सारीने औरंगाबादेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सारी आजाराचे आतापर्यंत १३७ रुग्ण आढळून आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा