ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजीमंडई, फळभाजीपाला बाजार १४ एप्रिलपर्यंत बंद

0
25
संग्रहित छायाचित्र.

ठाणेः ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, फळभाजीपाला बाजार आज १० एप्रिलच्या मध्यरात्रीपासून १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, ठाणे जिल्ह्यातील सर्वच भाजी मंडई, भाजीपाला बाजार आणि फळे व भाजीपाल्याची दुकाने १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येतील.  भाजीपाला बाजारात होणारी गर्दी पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत असन त्याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 या आदेशाचे उल्लंघन करणारांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१(ब), साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भादंविच्या कलम १८८ अन्वये दंडनीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, घराबाहेर पडताना नागरिक, अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी, मालवाहतूकदार यांना मास्क वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा