असा नराधम आपल्या घरात निर्माण होऊ न देणे हीच ‘त्या’ बहिणीला आदरांजलीः अजित पवार

0
82
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः हिंगणघाट प्रकरणातील निरपराध मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना महाराष्ट्राच्या मातीसाठी अतिशय लाजीरवाणी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार अधिक संवेदनशीलपणे गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करेल. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल. ती इतरांवर जरब बसवण्यासाठी असेल. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्ल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

विदर्भातील हिंगणघाट येते भर चौकात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेचा आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडितेला ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिले पाहिजे. असा नराधम आपल्या घरात निर्माण होऊ न देणे हीच पीडितेला आपली आदरांजली, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार-अनिल देशमुखः हिंगणघाट प्रकरणाचा खटला  फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. हिंगणघाटमधील पीडित मुलीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. पण ती वाचू शकली नाही. राज्य सरकार तिच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. पीडित मुलीच्या घरातील एका शासकीय नोकरी व इतर सर्व सहाय केले जाईल, अशी घोषणाही देशमुख यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा