शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारावर देवेंद्र फडणवीसांनी केली तब्बल 57 लाख रुपयांची उधळपट्टी!

0
361
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः विधानसभा निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगाभरतीनंतर केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर तब्बल 57 लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

 राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने केलेल्या वारेमाप उधळपट्टीची आकडेवारी हळूहळू समोर येऊ लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षातून आपल्या पक्षात मेगाभरती केली होती. आपल्या पक्षात घेतलेल्या या नेत्यांपैकी काही नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी विधानसभा निवडणुकीला अवघे चार महिनेच उरले असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा 16 जून रोजी शेवटचा विस्तार केला होता. या विस्तारात राधाकृष्ण विखे- पाटलांसह 13 जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या खर्चाचा तपशील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवला आहे.

तत्कालीन फडणवीस सरकारने या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारावर तब्बल 57 लाख 30 हजार 451 रुपये खर्च केले आहेत. त्यात मंडप- स्टेज उभारणी, सोफा, डनलॉप खुर्च्या यासाठी 54 लाख 91 हजार 400 खर्च केले आहेत. विद्युत रोषनाई व अन्य विद्युत कामांवर 1 लाख 69 हजार 844 रुपये तर पुष्प सजावट करण्यासाठी तब्बल 69 हजार 207 लाख रुपये असे एकूण 57 लाख 30 हजार 451 रुपये खर्च केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा