‘महाज्योती’ संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूरला

0
76
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : महाज्योती संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथील सामाजिक न्याय भवनाच्या नवीन इमारतीत स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली.

महाज्योती संस्थेमार्फत शासनाकडून हाती घेण्यात आलेल्या योजनांना विशेष गती देऊन या योजनांचा लाभ इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या आर्थिक विकासासाठी व्हावा यासाठी नागपूर येथे हे कार्यालय आहे. विदर्भामध्ये या समाजाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हे कार्यालय सामाजिक न्याय भवन नागपूर येथील नवीन इमारतीत कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहितीही वडेट्टवार यांनी दिली.

बहुजन कल्याण मंत्री वडेट्टीवार महाज्योती संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या नागपूर येथील मुख्यालयासाठी आवश्यक असणारे अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या वेतन, भत्ते व अन्य कार्यालयीन सोयी सुविधांबाबत आवश्यक ते आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील. याबाबतचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा