लॉकडाऊन महाराष्ट्रः आपत्कालीन परिस्थितीत ‘आडगळी’तील एसटी बसच धावणार मदतीला!

0
46
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी सरकारने एसटी महामंडळ व बेस्ट व टाकली आहे. विशेष म्हणजे राज्यातील लोकांनी एलिशान खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याच्या हव्यासापोटी दुर्लक्षिल्यामुळे आडगळीत पडून तोट्यात चालणारी एसटी बसच आणीबाणीच्या परिस्थितीत लोकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी सज्ज झाली.

मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत (तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होईल.) केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने – आण करण्यासाठी एसटीच्या  बसेस  दर ५ मिनिटांला याप्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.

 या बसेस धावतील दर पाच मिनिटांनीः १. पनवेल-वाशी, २. पनवेल-दादर, ३. पालघर-बोरिवली, ४.विरार- बोरिवली, ५. वाशी-दादर, ६.आसनगाव- ठाणे, ७.कल्याण- ठाणे, ८. कल्याण -दादर, ९.बदलापूर –ठाणे, १०. नालासोपारा- बोरिवली या मार्गावर धावतील. याव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील सर्व एसटी बसेस राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार रविवारी मध्य रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद झाल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा