खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार करणार केंद्र सरकारकडे पाठपुरावा

0
49
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा खामगाव-जालना रेल्वेमार्गाचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. राज्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा रेल्वेमार्ग असून तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत सांगितले.

 आमदार श्वेता महाले यांनी खामगाव जालना रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना परब बोलत होते. खामगाव-जालना रेल्वेमार्गाचा सर्व्हे ब्रिटिश काळात करण्यात आला. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीमार्फत या नवीन रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यात आल्याची कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यानंतर केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने २०१६-१७ या वर्षी भांडवली गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत खामगाव-जालना या रेल्वेमार्गाचा समावेश केला आहे. यानुसार सहा फेब्रुवारी २०१९ रोजी या मार्गाचा सर्व्हे करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यानुसार या रेल्वेमार्गाचा सर्व्हे झाल्यानंतर प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार होऊन प्रकल्पास नव्याने मान्यता देणे अपेक्षित आहे. या प्रकल्पास मान्यता मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे परब यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा