मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देणार, 89.85 अब्ज घनफूट पाणी वळवण्याची योजना : जयंत पाटील

0
202
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः एकात्मिक राज्य जल आराखड्यात अंतर्भूत असलेल्या योजनांचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी गठित केलेल्या अभ्यास समितीच्या शिफारशींनुसार मराठवाड्याला अतिरिक्त पाणी देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा प्रदेशात कोकणातील नार पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी खोऱ्यातून एकूण 89.85 अब्ज घनफूट पाणी वळवण्याबाबत आखणी करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. या पैकी 2.43 अ.घ.फू. पाणी वळणाच्या  बांधकामाधीन आहेत. 25.55 अ.घ.फू. पाणी वळणाबाबत पार-गोदावरी, दमणगंगा पिंजाळ पूर्ण झाल्यावर उर्ध्व वैतरणा ते गोदावरी नदीजोड व दमणगंगा- पिंजाळ पूर्ण व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

उर्वरित 61.88 अघफू पाणी वळविण्यासाठीच्या काही योजना प्रस्तावित तर काही प्रकल्पाधीन आहेत. अहमदनगर, जळगावसह मराठवाड्यातील क्षेत्र सिंचनाखाली आणणार आहे, असेही पाटील यांनी उपप्रश्नांना उत्तर देताना सांगितले. या विषयी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अंबादास दानवे, विनायक मेटे, सुरेश धस, शरद रणपिसे, जयंत पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा