भाजपमध्ये गेल्याने चित्रा वाघांचे मानसिक संतुलन बिघडलेः रुपाली चाकरणकरांचा सणसणीत टोला

0
1495
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजपची सत्ता येईल म्हणून चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्या होत्या. पण भाजपची सत्ता न आल्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी आता चित्रा वाघ यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यामुळे त्या काहीही बोलत सुटल्या आहेत, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगावला.

 हिंगणघाट येथील पीडित प्राध्यापिकेच्या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पेटले आहे. मात्र या विषयावर बोलताना चित्रा वाघ यांचा तोल सुटून जिभ घसरली आणि त्यांनी चाकणकरांविषयी अपशब्द वापरले होते.  पीडितेला मदत करण्याची राज्य सरकारची ऐपत नसेल तर भाजप मदत करण्यास तयार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. त्यावर रुपाली चाकणकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. सध्या पीडित मुलीला वाचवणे महत्वाचे आहे. चित्रा वाघ यांच्या बोलण्यात कोणताही अर्थ नाही. बबनराव लोणीकर, राम कदम हे महिलांविषयी काय बोलले होते? त्याचे काय झाले? याबाबतही चित्रा वाघ बोलल्या तर बरे होईल, असे सांगतानाच चित्रा वाघ मूळातच ओव्हर स्मार्ट आहेत, असे चाकणकर म्हणाल्या.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदत करणार नसतील तर  आम्ही मदत करू, असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. पीडितेला भाजपने मदत करण्यात कुणाचीही हरकत नाही. पीडितेचा जीव वाचणे सर्वात महत्वाचे आहे. मी स्वतः रुग्णालयात जाऊन पीडितेला भेटून आले. सरकारकडूनही रुग्णालयात तातडीने मदत पोहोचवण्यात आली, असे चाकणकर म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा