‘दात आणि घशा’वरून भाजपच्या चित्रा वाघ, राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांत शाब्दिक युद्ध

0
404
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपवासी झालेल्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यात ‘दात आणि घशा’वरून चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. चित्रा वाघ यांनी तुमचे दात हल्ली जास्त दिसताहेत, कधी घशात जातील याचा नेम नाही, असे म्हटले होते. त्यावर आमचे दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत, आपण ज्याच्यासाठी पातून उडी मारली तेवढेच आठवा म्हणजे पळता भुई थोडी होईल, अशा शब्दांत रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघांवर पलटवार केला आहे.

भाजपचे भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी  ट्विट करून ‘आपल्या पक्षाच्या या विकृती आपल्या भाजपचे संस्कार दाखवतात. का येथेही क्लीन चीट देणार? असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मारतानाच चित्रा वाघ आपण शांत का? खायचे दात एक अन् दाखवायचे दात एक…’ अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी नेत्यांच्या चुकीचे मी समर्थन करत नाही. परंतु तुमचे दात जास्तच दिसताहेत, ते सांभाळून ठेवा. कधी घशात जातील याचा नेम नाही, असे प्रत्युत्तर दिले होते. रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्या या टीकेला पुन्हा ट्विट करून उत्तर दिले आहे. ‘आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत. आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारतीलत तेवढेच आठवा, आजही पळता भुई कमी होईल… हिशेबात… झाकली मूठ सव्वा लाखाची…’ असा पलटवार केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा