माणसांच्या कळपातील हिंस्त्र श्वापदांचा नायनाट झाला पाहिजेः रुपाली चाकणकर

0
359

पुणेः आम्हाला उद्धवस्त करण्याचा अधिकार या नराधमांना कुणी दिला? माणसांच्या कळपातील या हिंस्त्र श्वापदांचा नायनाट झाला पाहिजे. फक्त श्रद्धांजली वाहून आणि मेणबत्त्या पेटवून समाज बदलणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हिंगणघाटच्या पीडितेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर दिली आहे.

हिंगणघाटच्या पीडितेचा आज सकाळी मृत्यू झाला. तिच्या मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामाजिक प्रबोधनाची खरी आणि स्त्रीला माणूस म्हणून सन्मान देण्याची खरी गरज आहे. जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी, मग वेदना आणि संवेदना समजेल, असे एक आई, बहीण आणि मुलगी या नात्याने वाटते, असे चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा