सदोष वीज मीटरमुळे ग्राहकांवर बिलाचा भुर्दंड पडणार नाहीः ऊर्जामंत्री

0
103
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: सदोष वीज मीटरमुळे ग्राहकांवर बिलाचा भुर्दंड पडणार नाही. सदोष वीज मीटरची निर्मिती करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानसभेत दिली.

आमदार सुनील राऊत यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. राऊत म्हणाले, राज्यात सिंगल फेजसाठी वीस लाख मीटर आवश्यक असून त्यातील दहा लाख नवीन जोडणीसाठी वापरली जातात. या सर्व मीटर्सची खरेदी ई-निविदा प्रक्रियेद्वारे केली जाते. रोलेक्स कंपनीने पुरवठा केलेल्या दहा लाख मीटर्सपैकी 4 लाख 30 हजार 902 मीटर्स सदोष आढळून आले आहेत. या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. सदोष मीटरचा परिणाम वीज बिल दरवाढीवर होणार नसून ग्राहकांनाही त्याचा बोजा पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा