बृहन्मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी परमबीर सिंह

0
81
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : भारतीय पोलिस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांची बृहन्मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आज सेवानिवृत्त होत असल्याने होणाऱ्या रिक्त पदावर सिंह यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सिंह हे भारतीय पोलीस सेवेच्या सन 1988 च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

परमबीर सिंह यांच्या बदलीमुळे रिक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपिन के.सिंग यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपवण्यात आला आहे. मुंबईचे पोलिस आयुक्तपद हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संबंध देशात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्तीसाठी सेवा ज्येष्ठतेचा निकष लावला जात नसल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंह यांना पसंती दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा