पदोन्नती मान्य केलेल्या दिनांकापासूनच होणार प्राध्यापकांची वेतन निश्चिती, समन्वयाच्या सूचना

0
243

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालयातील  सहाय्यक प्राध्यापकांच्या वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीमध्ये पदोन्नती करताना छाननी समिती आणि मूल्यमापन समिती गठित करुन त्याची वेतननिश्चिती करण्यात येते. मात्र यामध्ये विलंब होऊ नये, यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय असावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या.

विधानभवनात औरंगाबाद विभागातील प्राध्यापकांच्या विविध अडचणींसंदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते. बैठकीला आमदार विक्रम काळे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सामंत म्हणाले, प्राध्यापकांचे नुकसान होऊ नये यासाठी प्राध्यापकांच्या पदोन्नतीसंदर्भात समितीने पदोन्नती मान्य केलेल्या दिनांकापासून पदोन्नतीचा दिनांक निश्चित करुन त्यांची वेतननिश्चिती करावी.  यासाठी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालय यांनी समन्वय राखून कार्य करावे. तसेच तासिका तत्वावरील पदासाठी पात्र उमेदवार न मिळाल्यास पदव्युत्तर पदवीधर यांना संधी मिळावी, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल आणि विद्यापीठातील 6 हजार 690 अधिकारी/कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत नाही. त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा