महाविद्यालयीन तरूणांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी नागपूर, औरंगाबाद, नाशिकमध्येही राबवणार रंगवैखरी उपक्रम!

0
74

मुंबईः महाविद्यालयीन तरूणांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती येथेही रंगवैखरी हा उपक्रम राबवला जाईल, अशी घोषणा मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली.

रंगवैखरी हा उपक्रम सध्या मुंबई आणि पुण्यामध्येच राबवण्यात येतो. या उपक्रमाची व्याप्ती वाढवून नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावतीमध्येही हा उपक्रम राबवण्यात येईल, असे देसाई म्हणाले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. मागील सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले पुस्तकांचे गाव, रंगवैखरी आदि उपक्रम यापुढेही सुरू राहतील. उलट रंगवैखरी या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येईल. भिलार येथे पुस्तकांचे गाव हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्याचीही व्याप्ती वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असेही देसाई म्हणाले.

राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत राज्यात इंग्रजी माध्यमाच्या सुमारे 25 हजार शाळा आहेत. तेथे मराठी भाषा शिकवली जात नाही किंवा ऐच्छिक ठेवली जाते. अशा सर्व शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे केले जाणार आहे. त्यासाठी आगामी अधिवेशनात कायदा करण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा