औरंगाबाद विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

0
34
संग्रहित छायाचित्र.

मुंबई:  औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेत शासकीय ठराव मांडला होता. या विमानतळाचे पुनर्नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याकरिता याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागरी विमानचालन मंत्रालयाकडे पाठविण्यासाठी राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर तो पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या या ठरावाला सभागृहाने एकमताने संमती दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा