बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन

0
37

मुंबई: राज्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल-दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या आहेत त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम टप्पा-2 राबविण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या कामात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घ्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामाची आढावा बैठक झाली.

मराठवाडा वॉटर ग्रीड: मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी मराठवाडा वॉडर ग्रीड हा अत्यंत उपयुक्त प्रकल्प आहे. परंतु हे करीत असताना कृषी व्यवसाय व पिण्याचे पाणी यांचा समतोल राखला जावा. मराठवाड्यातील 8 जिल्हे आणि 11 धरणांना जोडणाऱ्या प्रकल्पामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल.

जल जीवन मिशन राबविणार: प्रत्येक घरात घरगुती नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या जल जीवन मिशन कार्यक्रमाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. पाणी पुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी ठोक पाणीपुरवठ्याचे राज्यात एकसारखे दर निश्चित करण्याचे धोरण ठरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा