शुक्रवारी मुंबईत ‘साहित्य मंजिरी’ महिला साहित्य संमेलन

0
44
संग्रहित छायाचित्र.

मुंबई :  महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई मराठी पत्रकार संघ व स्त्री आधार केंद्र यांच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त ‘साहित्य मंजिरी’ महिला साहित्य संमेलनाचे आयोजन 13 मार्च 2020 रोजी करण्यात आले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ सभागृह, पत्रकार भवन, महानगरपालिका मार्ग, आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे दुपारी 3 ते 8 यावेळेत हे संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर या आहेत तर स्वागताध्यक्षपदी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आहेत.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, महिला अर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद तसेच कवयित्री संमेलन होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा