बीडमध्ये आज संविधान बचाव महासभा; चंद्रशेखर आझाद येणार, सर्वपक्षीय संघटनांचा पाठिंबा

0
54
प्रतीकात्मक छायाचित्र.

 बीडः सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात बीडमध्ये संविधान बचाव कृती समितीच्या वतीने आज, बुधवारी संविधान बचाव महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता शिवाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात ही महासभा येणार आहे.

 या संविधान बचाव महासभेसाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना अबु तालीब रहमानी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तिस्टा सेटलवाड, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि जेएनयूची विद्यार्थी नेत्या दिपसिता धार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संविधान बचाव महासभेला बीड जिल्ह्यातील सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा