कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावांच्या नगर परिषदेबाबत लवकरच निर्णय

0
35
संग्रहित छायाचित्र.

मुंबई :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यात यावी यासंदर्भातील मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भातील सूचना व हरकतींवरील सुनावणी सुरु असून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येईल, असे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

या 27 गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेच्या मागणीसंदर्भात 7 सप्टेंबर 2015 रोजी अधिसूचना काढण्यात आली होती. यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. यावरील सुनावणी घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी न दिल्याने सुनावणी बाकी होती.  आता सुनावणी सुरु झाली आहे. याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येईल  असेही शिंदे म्हणाले. या विषयावरील चर्चेत सदस्य हेमंत टकले, भाई जगताप, श्रीमती विद्या चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा