अंगणवाडी सेविकांची सहा हजार रिक्त पदे भरणार

0
422
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांची रिक्त असलेली सुमारे सहा हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (सोनवणे) यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

गेली पाच वर्षे अंगणवाडी सेविकांची पदे भरली गेली नव्हती. सन 2018 ला या सेविका तसेच त्यांच्या मदतनीस यांचे मानधनात वाढ करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या समन्वयाने त्यांना मानधन हे वेळेत दिले जावे  यासाठी काम करण्यात येईल, असे ठाकूर यांनी सांगितले. हेमंत टकले, भाई गिरकर, श्रीमती हुस्न बानो खलिफे आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा