प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बसमध्ये दूरध्वनी क्रमांक झळकणार

0
42
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : प्रवाशांच्या तक्रारी अथवा समस्यांचे तातडीने निरसन करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती बस ज्या आगाराची आहे त्या आगारप्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक व त्या विभागप्रमुखाचा दूरध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करावा, असे निर्देश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष  ॲड. अनिल परब यांनी दिले.

ॲड. अनिल परब म्हणाले, दररोज एसटीने सुमारे ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित प्रवासाबरोबरच प्रवाशांना सौजन्यशील सेवा देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख ध्येय आहे. एसटीच्या प्रवाशांना प्रवासामध्ये काही समस्या उद्भवल्यास अथवा प्रवासी सेवेबाबत काही सूचना द्यावयाची असल्यास संपर्क करण्यास अडचणी येतात. सेवा क्षेत्रामध्ये काम करीत असताना ग्राहकाचे महत्तम समाधान हेच ‍अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. ग्राहकाच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचे निराकरण त्या-त्या पातळीवर तातडीने होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांनी आपले उत्तरदायित्व ओळखून प्रत्येक प्रवाशाच्या तक्रारी अथवा समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. प्रवासी सेवांचा दर्जा उंचावणे व अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चालक-वाहकांच्या बरोबरच अधिकाऱ्यांनी देखील प्रवाशांच्या समस्या जाणून त्याचे तातडीने निरसन करणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा