विद्यापीठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यशदा किंवा अध्यापक विकास संस्थेतच देण्याचे आदेश

0
32

मुंबई: विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पुणे येथील यशदा किंवा  अध्यापकांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या अध्यापक  विकास संस्थेतच देण्यात यावे, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी येथे दिले.

विधानभवनात विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी  सामंत बोलत होते. सामंत म्हणाले, यशदा ही शासनाची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण या संस्थेमध्येच देण्यात यावे. राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीतील बदल लक्षात घेऊन शासनाने अध्यापक विकास संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासारख्या शासकीय संस्थेमध्येच प्रशिक्षण दिले जावे. कोणत्याही खासगी संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यात येऊ नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे  सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर संबधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा