शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त ९७ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेस मंजुरी

0
51
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त 97 गावांसाठी इगतपुरी येथील भावली धरणाच्या पाण्यावर आधारित नळ पाणी पुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

आमदार शांताराम मोरे यांनी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना पाटील बोलत होते. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी २०१६-१७ मध्ये भावली धरणाच्या पाण्यावर आधारित नळ पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली. मात्र, दरडोई खर्च निकषापेक्षा जास्त असल्याने या योजनेस उच्चाधिकार समितीची मंजूरी मिळणे आवश्यक होते. त्यानुसार 4 फेब्रुवारी 2020 रोजीच्या बैठकीत या पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा