व्हिडीओः तुमच्या पूर्वजांनी छत्रपतींचा राज्याभिषेक का नाकारला?: नवाब मलिकांचा भाजपला सवाल

0
444
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतोय, मात्र तुम्ही नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत आहात. तुमच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला होता, असा सवाल करत या प्रश्नाचे उत्तर जनतेला अपेक्षित असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

कालपासून भाजपवाल्यांकडून नवाब मलिक यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे. त्यावरून नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दोन वर्षापूर्वी शिवस्वराज्य यात्रेतील रायगडावर पक्षाचे सर्व नेते एकत्र फोटो काढण्यासाठी जवळ आले होते. धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली. त्यावेळी सर्वजण जय म्हणाले, मीही जय म्हणालो. फक्त हात वर केला नाही याचे भांडवल करून भाजपवाले वेगळा प्रचार करत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. त्यावेळीही मी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली आणि आजही देत आहे. सरकारच्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटनप्रसंगी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देऊनच सुरुवात केली होती, याची आठवणही मलिक यांनी करून दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा