शास्त्रज्ञांनी शोधला वेदनेची संवेदना जाणणारा नवीन अवयव

0
90

वेदनेची जाणीव होणाऱ्या श्वान पेशींचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. ऑक्टोपससारखा दिसणारा हा अवयव मज्जातंतूमध्ये असतो. या शोधामुळे नवीन वेदनानिवारक औषधांचा शोध लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शरीरातील वेदनांची जाणीव होणारा नवीन अवयव शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. त्यामुळे नवीन वेदनानिवारक औषधे विकसित करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ऑक्टोपससारखा दिसणारा हा नवीन अवयव मज्जातंतूभोवती व्यापलेला असतो. तत्वेच्या बाह्यस्तरावर असणाऱ्या या विशेष पेशींनाच शरीरातील वेदनांची जाणीव होते. तुमच्या ‘आऊच!’ च्या भावनेच्या संवेदनेमागे हा नवा अवयव असतो. तोच वेदनेची जाणीव करून देतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

शरीरातील वेदना नेमकी कशी जाणवते, याचा शास्त्रज्ञ अनेक दिवासांपासून शोध घेत होते. या दीर्घकाळापासून विचारविमर्श सुरू असलेल्या प्रश्नाचे उत्तर या शोधामुळे मिळण्यास मदत होणार असून त्यामुळे वेदनेच्या मुळाशीही जाता येईल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

अनेक प्रकारच्या तीव्र वेदना विकारांना प्रत्यक्षात याच विशेष पेशी कारणीभूत ठरतात की काय?, हा आता आमच्यासाठी मोठा प्रश्न आहे, असे स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इंस्टिट्यूटचे प्रोफेसर आणि या संशोधनाचे सहलेखक प्रोफेसर पॅट्रिक अर्नफोर्स यांनी म्हटले आहे.

सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात शास्त्रज्ञांनी आजवर मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या त्वचेमधील या विशेष पेशींच्या स्वरुपाची कशी पडताळणी केली हे उघड केले आहे. या विशेष पेशी श्वान पेशी प्रकारातील असून त्या मज्जातंतूच्या पेशींना वेढून असतात आणि त्यांना जीवंत ठेवण्यासाठी मदतही करतात.

या श्वान पेशींचा आकार ऑक्टोपससारखाच आहे. त्वचेच्या बायस्तराच्या खालच्या भागाला या श्वान पेशी असतात खऱ्या मात्र त्या वेदनेची संवेदना करणाऱ्या मज्जातंतूच्या पेशींपर्यंत पोहोचून त्यांना वेढलेल्या असतात. मज्जातंतूच्या पेशी एपिडेर्मिसपर्यंतच येऊन थांबतात आणि त्या खुल्या किंवा वेढलेल्या नसतात, असा आजपर्यंतचा समज होता. पण त्या समजापलीकडचे हे रहस्य पाहून शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला. जेथे दुखते, त्या वेदनेची संवेदना असणाऱ्या पेशी खुल्या असतात, असे आपण बोलत होतो, प्रत्यक्षात त्या पेशी खुल्या नसतात, असे अर्नफोर्स म्हणाले.

या श्वान पेशींनाच वेदनेची जाणीव होते, हा शास्त्रज्ञांच्या या पथकाचे सर्वात शोध आहे. शास्त्रज्ञांनी या शोधासाठी ऑप्टोजेनेटिक्सचा वापर केला आहे. त्यासाठी त्यांनी जनुकीय संरचनेत बदल केलेल्या उंदरावर प्रयोग केले. आता या श्वान पेशी वेदना संवेदी मज्जातंतू पेशींपर्यंत वेदनेचे सिग्नल्स कसे पोहोचवतात, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे, असे लंडनच्या किंग्ज कॉलेजचे संवेदी प्रणालीचे तज्ज्ञ प्रोफेसर पीटर मॅटनॉटन यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा