मोबाइलवर जास्त वेळ घालवल्याने मानसिक आरोग्यावर पडत नाही फारसा परिणाम!

0
92

नवी दिल्लीः सर्वसाधारणपणे स्मार्टफोनच्या वापराच्या नकारात्मक परिणामांबद्दल अनेक लोक चर्चा करताना दिसतात, परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनात टीनएजर्सनी आपल्या स्मार्टफोनवर जास्तीचा वेळ घालवणे मानसिक आरोग्यासाठी आपण समजतो तेवढे हानीकारक नाही. स्मार्टफोन आणि सोशल मीडिया युवक- युवतींच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करत आहे, अशी सर्वसाधारण धारणा असली तरी ऑनलाइन घालवलेल्या वेळाचा आणि मानसिक आरोग्याच्या समस्येच्या वाढलेल्या जोखमीचा फारसा संबंध नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे, असे नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील सहायक प्राध्यापक मायकेलिन जेन्सन सांगितले. क्लिनिकल सायकॉलॉजी या विज्ञान पत्रिकेमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. या संधोशनात संशोधकांनी 10 ते 15 वर्षे वयादरम्यानच्या दोन हजारांहून अधिक टीनएजर्सची चाचणी घेतली. संशोधकांनी दिवसातून तीन वेळा किशोरांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित लक्षणांचा अहवाल संकलित केला. त्याचबरोबर दररोज ते स्मार्टफोन किंवा सोशल मीडियावर जेवढा वेळ घालवतात, त्यासंबंधीचा अहवाल रात्री तयार केला. या अहवालांत असे आढळून आले आहे की,  डिजिटल तंत्रज्ञानाच्या अत्यधिक वापराचा संबंध खराब मानसिक आरोग्याशी नसल्याचे आढळून आले आहे. ज्या युवांनी अत्यधिक टेक्स्ट मेसेज पाठवले, त्यांच्या तुलनेत ज्या युवांनी कमी टेक्स्ट मेसेज पाठवणाऱ्या युवांपेक्षा त्यांना चांगले वाटत असल्याचे अहवालात आढळून आले आहे. असे असले तरी तंत्रज्ञानाच्या अत्यधिक वापर टाळण्याचा सल्ला देतानाच विशेषज्ञांनी स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्यावर भर दिला आहे.

कोणत्याही तरूणाच्या दैनंदिन जीवनमानात इनडोअर आणि आऊटडोअर व्यवहारांचे योग्य संतुलन असले पाहिजे. अभ्यास आणि मौजमजेतही संतुलन असणे अत्यंत आवश्यक आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ आणि नोएडाच्या फोर्टिस मानसिक आरोग्य प्रकल्पाचे संचालक समीर पारेख यांनी म्हटले आहे.

टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर एका मर्यादेतच करणे आवश्यक आहे. मित्रांशी गप्पागोष्टी, कुटुंबातील वेळ, खेळणे आणि अभ्यासापेक्षा या गोष्टीला कदापिही जास्तीचे महत्व देता कामा नये. त्यात संतुलन राखले गेले पाहिजे. मित्रांशी गप्पा करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करणे चांगली गोष्ट आहे, परंतु युवकांनी मित्रांना प्रत्यक्ष भेटून समोरासमोर गप्पागोष्टी करण्यालाही महत्व दिले पाहिजे, असे पारेख यांचे म्हणणे आहे. कुटुंबातील वडिलधाऱ्यांनी एक चांगले रोलमॉडेल बनून मुलांच्या समग्र जीवनशैलीचा एक चांगले वळण देण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे, असे पारेख सांगतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा