औरंगाबादेत ३० नवीन कोरोना बाधित रूग्ण; टिळक नगर, भाग्य नगरमध्येही शिरकाव

0
114
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात आज ३० नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या १३६० झाली आहे. विशेष म्हणजे आज आढळलेल्या रूग्णांमध्ये टिळकरनगर, भाग्यनगर,एन-४ सिडको अशा उच्चभ्रू वसाहतींचाही समावेश आहे.

आज आढळलेल्या रूग्णांमध्ये शिवशंकर कॉलनीत २, जहागीरदार कॉलनीत २,  सुभाषचंद्र बोस नगरमध्ये ४ आणि टिळक नगर, भाग्य नगर, एन-४ सिडको, मिसारवाडी, सिद्धेश्वर नगर- जाधववाडी, ईटखेडा परिसर, जयभीम नगर, अल्तमश कॉलनी, शिवनेरी कॉलनी एन-९, रोशनगेट परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, हमालवाडी, जयभवानी नगर, समता नगर, जुना मोंढा, जुना बाजार, शहानवाज मशीद परिसर, सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर या भागातील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. या रूग्णांमध्ये सिल्लोड आणि गंगापूरमधील प्रत्येकी एक रूग्णाचाही समावेश आहे. आज आढळून आलेल्या रूग्णांत २१ पुरूष आणि ९ महिलांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा