मोदी मंत्रिमंडळाचा नवा चेहराः अमित शाह देशाचे पहिले सहकार मंत्री, राणेंकडे लघु व मध्यम उद्योग

0
618
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा काल विस्तार झाल्यानंतर खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. केंद्रात नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. शाह हे देशाचे पहिले सहकार मंत्री ठरले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्मिक, पेन्शन, नागरी तक्रार खात्यासह विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय राहील.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात मोठे बदलही करण्यात आले आहेत. पियुष गोयल यांच्याकडील वाणिज्य मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडे वस्त्रोद्योग आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरातचे मनसुख मंडाविया हे नवे आरोग्य मंत्री असतील. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे  शिक्षण मंत्रालय देण्यात आले आहे.

अश्विनी बैष्ण यांना रेल्वे मंत्री करण्यात आले आहे. त्यांना माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क खात्याचीही जबाबदारी दिली आहे. स्मृती इराणींकडे महिला आणि बाल विकास खाते देण्यात आले आहे. त्या स्वच्छ भारत मोहिमेचेही काम पाहतील. किरेन रिजीजू यांच्यावर कायदा आणि न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. हरदीपसिंग पुरी यांच्याकडे खते आणि रसायन, नगरविकास, गृहन निर्माण आणि पेट्रोलियम मंत्रालय देण्यात आले आहे.

अनुराग ठाकूर यांच्यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुरूषोत्तम रुपाला यांना दुग्ध आणि मत्स्य विकास तर ज्योतिरादित्य शिंदे यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. भूपेंद्र यादवांना कामगार मंत्रालय तर गिरीराजसिंह यांना ग्रामविकास मंत्रालय देण्यात आले आहे.

 प्रल्हाद जोशी यांच्याकडे संसदीय कामकाज खात्यासह कोळसा आणि खाण मंत्रालय, सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे जहाज वाहतूक, बंदेर आणि जलवाहतूक खात्यासह आयुष मंत्रालय देण्यात आले आहे. पशुपती पारस यांना अन्न प्रक्रिया उद्योग खाते देण्यात आले आहे.

 महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली खाती अशीः कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्याकडे लघु व मध्यम उद्योग, राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, डॉ. भागवत कराड यांच्याकडे अर्थ, कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज खाते देण्यात आले आहे. राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे, कोळसा, खाण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय खाते कायम ठेवण्यात आले आहे.

यांची खाती कायमः अमित शाह यांच्याकडील गृह, राजनाथ सिंह यांच्याकडील संरक्षण, निर्मला सीतारामन यांच्याकडील अर्थ, नितीन गडकरी यांच्याकडील परिवहन, नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडील कृषी, जयशंकर यांच्याकडील परराष्ट्र व्यवहार, मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडील अल्पसंख्याक, अर्जुन मुंडा यांच्याकडील आदिवासी विकास खाते कायम ठेवण्यात आले आहे.

अन्य राज्यमंत्री असेः

 • अनुप्रिया पटेलः वाणिज्य व उद्योग.
 • ए.पी. सिंह बघेलः कायदा आणि न्याय.
 • राजीव चंद्रशेखरः कौशल्य विकास, उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान.
 • शोभा करंदजलेः कृषी आणि शेतकरी कल्याण
 • भानू प्रतास सिंहः सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग.
 • दर्शना विक्रम जरदोशः वस्त्रोद्योग व रेल्वे.
 • अन्नपूर्णा देवीः शिक्षण.
 • नारायण स्वामीः सामाजिक न्याय.
 • कौशल किशोरः गृह निर्माण आणि नगरविकास.
 • अजय भट्टः संरक्षण आणि पर्यटन.
 • बी.एल. वर्माः ईशान्य क्षेत्र विकास आणि सहकार.
 • अजय कुमारः गृह.
 • देवुसिन्ह चौहानः कम्युनिकेशन.
 • भगवतं खुंबाः अपारंपरिक ऊर्जा, रसायन व खते.
 • प्रतिमा भौमिकः सामाजिक न्याय.
 • सुभाष सरकारः शिक्षण.
 • राजकुमार रंजनसिंहः परराष्ट्र व शिक्षण.
 • विश्वेश्वर तुडूः आदिवासी विकास, जलशक्ती.
 • मुंजूपारा महेंद्रभाईः महिला व बालविकास, आयुष.
 • जॉन बारलाः अल्पसंख्यांक विकास.
 • एल. मुरूगनः मत्स्य, पशुपालन, दुग्धविकास, माहिती व प्रसारण.
 • निसिथ प्रामाणिकः गृह आणि क्रीडा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा