औरंगाबादच्या जागतिक धम्म परिषदेत दलाई लामांच्या धम्मदेसनेचे थेट प्रक्षेपण, मराठीत अनुवाद

0
293
पत्रकार परिषदेत माहिती देताना भिक्खू गण.

औरंगाबादः जागतिक किर्तीचे बौद्ध धम्मगुरू दलाई लामा हे औरंगाबादेत आयोजित जागतिक धम्म परिषदेला हजेरी लावणार असून चौका येथील लोकुत्तरा बुद्ध महाविहारातील प्रशिक्षण केंद्रात ते देश – विदेशातील सुमारे 350 भिक्खूना मार्गदर्शन करणार आहेत. दलाई लामा आणि बौद्ध भिक्खूमधील संवाद पीईएस क्रिडासंकुलावर उपस्थित असलेला जनसुमदाया ऐकायला आणि पाहयला मिळावा म्हणून त्याचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे मुख्य संयोजन डॉ. हर्षदिप कांबळे आणि रोजना व्हॅनीज कांबळे यांनी  बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 24 नोव्हेंबरला दलाई लामा धम्म परिषदेत उपस्थित उपासक- उपासकांना धम्म देसना देणार असून त्यांच्या या भाषणाचा मराठीत अनुवाद केला जाणार आहे. 22, 23 आणि 24 नोव्हेंबर असे तीन दिवस पीईएस शिक्षण संस्थेच्या नागसेन वनातील स्टेडियमवर ही धम्म परिषद होत आहे.

जगात मैत्रीभावना निर्माण करणारे दलाई लामा यांनी बोट, तिबेटीयन किंवा अन्य कोणत्याही भाषेत मार्गदर्शन केले तरी आमच्या अनुवादक उपलब्ध असून ही विदवता आम्हाला केवळ बाबासाहेबांमुळेच मिळालेली असल्याचे भदन्त बोधीपालो महाथेरो यांनी अर्वजून सांगितले. बहुजनहिताय-बहुजन सुखाय हा बुद्धाचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचावा. भारताची वाटचाल प्रबुद्ध भारताच्या दिशेने व्हावी म्हणून या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे अखिल भारतीय बौद्ध भिक्खू महासभेचे अध्यक्ष तथा संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर यांनी दिली.

जपान, कोरिया, थायलंड, नेपाळ, श्रीलंका आदी देशातील भिक्खू येथे येणार आहेत. दलाई लामा आदी अनेक मान्यवर धम्मोपदेकांचीही परिषदेला उपस्थिती लाभणार आहे. तीन दिवसीय परिषदेत एक लाखापेक्षा अधिक उपासक, उपासिकांची उपस्थिती राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद हा बुद्ध विचारांची भूमी राहिलेला जिल्हा आहे. पैठण परिसरासह अजिंठा-वेरूळ, पितळखोरा आदी भागात बौद्ध धम्माची प्रमुख केंद्रे राहिलेली आहेत. विसंगतेवर एकसंगतेचा संदेश बुद्धांनी दिला.त्याचे प्रात्यक्षिक येथील भूमीवर केलेले आहे, असे बोधीपालो महाथेरो म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा